रावेरात इंधन दरवाढीचा निषेध : राष्ट्रवादीचे तहसीलबाहेर आंदोलन


गॅस सिलिंडरचा सत्कार करीत केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी

रावेर : केंद्र सरकारने वाढविलेल्या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरीकांचे कंबरडे मोडले आहे. पेट्रोल, डिझेल व गॅसच्या दरवाढीविरुद्ध केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी शनिवारी रावेर येथील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयासमोर किसान सेल जिल्हाध्यक्ष सोपान बाबुराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व महिला तालुकाध्यक्ष माया बारी यांच्या नेतृत्वाखाली गॅस सिलेंडर दराने हजाराचा आकडा गाठल्याने गॅस सिलिंडरचा सत्कार करून केंद्र सरकारच्या विरोधात निषेध नोंदवण्यात आला व धरणे आंदोलन करून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी केंद्र सरकारच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.

यांची आंदोलनप्रसंगी उपस्थिती
यावेळेस किसानसेल जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, जिल्हा उपाध्यक्ष गोटू शेठ, तालुकाध्यक्ष नीळकंठ चौधरी, शहराध्यक्ष मेहबूब शेख, कार्याध्यक्ष विलास ताठे, युवक शहराध्यक्ष प्रणीत महाजन, शहर कार्याध्यक्ष मयूर, महिला तालुकाधध्यक्षा माया बारी, महिला शहराध्यक्षा कुसुम मोरे, उपाध्यक्षा सुनंदा बिर्‍हाडे, उपाध्यक्षा इंदू हिवरे, सरचिटणीस कमला पंत, सचिव कविता गोडसे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




कर्मचार्‍यांना बांधल्या राख्या
यावेळी अग्निशमन दलाच्या कर्मचार्‍यांना महिला कार्यकर्त्यांनी राखी बांधत मिठाई दिली. महिला पदाधिकार्‍यांनी राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष तथा कृउबा संचालक नीलकंठ चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष मेहबूब शेख यांना आणि अग्निशमन दलाच्या कर्मचार्‍यांना राखी बांधून सामाजिक ऐक्य जोपासले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !