भुसावळ स्पोर्ट्स अ‍ॅण्ड रनर्स असोसिएशनतर्फे रक्षाबंधन उत्साहात


भुसावळ : भुसावळ स्पोर्ट्स अ‍ॅण्ड रनर्स असोसिएशनतर्फे रविवारी रक्षाबंधन सणानिमित्त विशेष रनचे आयोजन करण्यात आले. त्यानिमित्ताने भुसावळ रर्नसच्या महिला व पुरुष सदस्य यांनी एकत्र धावून रक्षाबंधनानिमित्त आरोग्याचा संदेश दिला. त्यानंतर विधीवत रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला. रविवारी पहाटे 5.45 वाजता वॉर्मअप झाले. त्यानंतर सहा वाजता सदस्यांनी धावायला सुरुवात केली. सर्व सदस्यांनी पाच ते दहा किलोमीटरचे अंतर धावून पूर्ण केले. त्यानंतर स्ट्रेचिंग एक्सरसाइज घेण्यात आली. त्

रक्षाबंधन सण उत्साहात
ऑफिसर्स कॉलनीजवळ डॉ.चारुलता पाटील, डॉ.नीलिमा नेहेते, योग शिक्षिका पूनम भंगाळे यांनी प्रमोद शुक्ला, प्रवीण वारके, रणजीत खरारे, गणसिंग पाटील, प्रवीण पाटील यांना राखी बांधून विधीवत रक्षाबंधन सण साजरा केला. याप्रसंगी डॉ.संजय नेनेहेते यांची विशेष उपस्थिती होती. भुसावळ रनर्सचे 100 हून अधिक महिला व पुरुष सदस्य एकत्र धावण्याचा सराव करतात. सध्या कोरोना आजाराच्या निर्बंधांमुळे प्रत्येक सदस्य एकाकी धावून सराव करीत आहे. लवकरच सर्व सदस्य एकत्र सराव करू, असा आशावाद यावेळी डॉ.नीलिमा नेहेते यांनी व्यक्त केला. डॉ.चारुलता पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. रक्षाबंधनाच्या या पवित्र सणानिमित्त आयोजित या रन बद्दल प्रवीण फालक, डॉ.तुषार पाटील, ब्रिजेश लाहोटी, सचिन अग्रवाल यांनी सर्व सदस्यांचे कौतुक केले.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !