भाडेकर्‍यासोबत सुनेच्या अनैतिक संबंधाचा संशय : सासर्‍यानेच केली पाच जणांची हत्या


नवी दिल्ली : सेनेचे भाडेकरूशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून निवृत्त सैनिक असलेल्या सासर्‍याने कुटुंबातील सदस्यांसह भाडेकरूसह त्याच्या पत्नीची हत्या केली. मयतांमध्ये दोन मुले, दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. हरीयाणामधील गुरुग्राम भागातील राजेंद्र पार्कमध्ये ही घटना घडली आहे.

खुनानंतर संशयीत पोलिसांपुढे हजर
येथे एका घरमालकाने त्याची सून, भाडेकरू, भाडेकरूची पत्नी आणि त्यांच्या मुलांची हत्या केली आहे. हत्या केल्यानंतर आरोपी स्वत: पोलीस ठाण्यात हजर झाला. आरोपीला त्याची सून आणि भाडेकरूमध्ये अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. त्यामुळे त्याने हे हत्याकांड घडवून आणले. त्यानंतर राव राय सिंह नावाचा हा आरोपी स्वत: पोलीस ठाण्यात पोहोचला. आता पोलिसांनी त्याला अटक करून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. आरोपी सासरा हा निवृत्त सैनिक असल्याचे सांगण्यात येत आहे. सामाजिक कार्यकर्ता म्हणून परिसरात त्याची ओळख आहे. तसेच त्याला ट्रीमॅन म्हणून ओळखले जाते. दरम्यान, पोलीस तपासामध्ये एका खाजगी बँकेत काम करणार्‍या कृष्णा तिवारीसह एकूण 5 जणांची हत्या झाल्याचे समोर आले आहे. आरोपी राव राय सिंह हा पोलीस ठाण्यात पोहोचला आणि त्याने पाच जणांची हत्या केल्याचा जबाब दिला. त्यामध्ये त्याच्या सुनेचाही समावेश होता. त्याचे बोलणे ऐकून पोलिसांना धक्का बसला. आरोपीला त्याची सून आणि भाडेकरूमध्ये अफेअर असल्याची शंका होती. त्यातूनच त्याने या हत्या केल्या.





 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !