बस-दुचाकी अपघातात दाम्पत्य ठार


दोंडाईचा : बस व दुचाकी धडक होवून झालेल्या अपघातात दाम्पत्याचा मृत्यू झाला. गुरूवारी सकाळी 10.30 वाजता हा अपघात निमगुळ-दोंडाईचा रस्त्यावरील निमगुळ गावापासून दोंडाईचाकडे जाताना झाला. या अपघातात ओसर्ली, ता.नंदुरबार येथील रवींद्र मुकुंद गिरासे (60) उजनबाई रवींद्र गिरासे (50, रा.ओसर्ली) हे दाम्पत्य ठार झाले. गिरासे दाम्पत्य दुचाकी (एम.एच.05 ए.एल.260) ने बाजार करण्यासाठी दोंडाईचाकडे निघाले असता समोरून येणार्‍या बस (एम.एच.20 बी.एल.4045) ने धडक दिल्याने गिरासे दाम्पत्य जखमी झाले. त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ.अर्जुन नरोटे यांनी मृत घोषित केले. अपघाताची माहिती कळताच पोलीस उपनिरीक्षक सचिन गायकवाड, दिनेश मोरे यासह पोलीस कर्मचार्‍यांनी धाव घेतली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !