धक्कादायक ! : छेडखानीला कंटाळून तरुणीची आत्महत्या : दोघांना अटक


नवी दिल्ली : सतत टोळक्याकडून होणार्‍या छेडखानीला कंटाळून तरुणीने आत्महत्या केली असून पोलिसांनी या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करीत दोघांना अटक केली. दरम्यान, तरुणीने मृत्यूपूर्वी सुसाईड नोट लिहिली असून त्यात ‘माझ्या मृत्यूला रुस्तम जबाबदार आहे. त्याने माझ्याशी दुष्कर्म केले आहे. पप्पा तुम्ही माझ्या मृत्यूचा बदला जरूर घ्या’, असं लिहिलं आहे. या सुसाईट नोटमुळे एकाच खळबळ उडाली आहे.

छेडखानीला कंटाळून उचचले टोकाचे पाऊल
जौनपूर जिल्ह्यातील सुरेरी पोलीस ठाण्यांतर्गत येणार्‍या एका गावात राहणार्‍या 15 वर्षीय मुलीला काही तरुण त्रास देत असल्याने तिने या प्रकाराला कंटाळून मंगळवारी रात्री पंख्याला साडीने गळफास घेतला. सकाळी मुलगी न उठलयाने आईने खोलीचा दरवाजा डोकावला असता हा प्रकार लक्षात आला. अल्पवयीन मुलीने तिच्या मृत्यूसाठी रुस्तमला जबाबदार धरले असून रुस्तमने आपल्यासोबत वाईट कृत्य केल्याचा आरोप मृत मुलीने या सुसाईड नोटद्वारे केला असून पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे.





 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !