धक्कादायक ! : पोलीस ठाण्यातच कापला पत्नीचा गळा
पाटणा : कौटुंबिक वादाबाबत पोलीस ठाण्यात समेट सुरू असताना संतप्त पतीने आपल्या पत्नीचा गळा कापल्याने खळबळ उडाली. या घटनेने त्नी गंभीर जखमी झाले असून पतीला अटक करण्यात आली. बिहारच्या वैशाली जिल्ह्यातील महुआ पोलीस ठाण्यात ही घटना घडली.




आरोपी पतीला अटक
पती भांडत असल्याने शबनम (28) ही विवाहिता माहेरी आली. तिला परत आणण्यासाठी तिचा पती सोनू रानीपोखरला पोहोचला. शबनम आणि सोनू यांचं भांडण मिटावं, समेट घडावा यासाठी शबनमच्या पालकांनी दोघांना पोलीस ठाण्यात नेलं. पोलीस कारवाई होत असताना सोनू संतापला. पोलीस ठाण्याच्या परिसरातच त्यानं तिचा गळा कापण्याचा प्रयत्न केला. शबनमच्या कुटुंबीयांनी सोनूला पकडून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं. पोलिसांनी सोनूला तुरुंगात टाकलं. शबनमला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शबनमच्या भावानं सोनूविरोधात एफआयआर दाखल केला आहे.