संतापजनक ! : पुण्यात 25 वर्षीय तरुणीवर गँगरेप
पुणे : शहरातील जनता वसाहतीत 25 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी उघडकीस आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी श्रीकांत सरोदे (36), आदित्य ऊर्फ सन्या पवार (19), सुर्वेश जाधव (36) आणि आशिष मोहिते (18, सर्व रा. जनता वसाहत) यांना अटक करण्यात आली. याबाबत दत्तवाडी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा इंदलकर यांनी सांगितले की, 25 वर्षाची तरुणी भारती विद्यापीठ परीसरात राहते. ही तरुणी शुक्रवारी सायंकाळी स्वारगेटवरुन घरी जात होती. यावेळी आरोपींपैकी एकाने तिची ओळख काढून तिला जनता वसाहतीत आणले. त्यानंतर त्याने इतरांना बोलावून घेतले. चौघांनी मिळून तिच्यावर बलात्कार केला. हा सर्व प्रकार सुरु असताना या तरुणीच्या रडण्याचा आवाज आल्याने गल्लीत राहणार्यांना संशय आला. त्यांनी घराला बाहेरुन कडी लावली व पोलिसांना कळविले. दत्तवाडी पोलीस तातडीने घटनास्थळी पोहचले व या तरुणीची सुटका करुन चौघांना अटक केली.
