खासदार भावना गवळींच्या पाच संस्थांवर ईडीची छापेमारी


वाशीम : शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्या पाच संस्थावर ईडीने सोमवारी अचानक छापे टाकल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिवसेनेच्या यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांच्या 5 संस्थांवर ईडीने धाडी टाकल्या आहेत. ईडीने वाशिम जिल्ह्यातील रीसोड इथे या धाडी टाकल्याचं सांगण्यात येत आहे. रीसोड येथील उत्कर्ष प्रतिष्ठाना, बालाजी सहकारी पार्टीकल बोर्ड, बीएमएस कॉलेज, भावना ऍग्रो प्रोडक्ट सर्व्हिस लिमिटेड या सर्व कंपन्यांवर ईडीने धाडी टाकल्याचे वृत्त आहे. शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्यावर 100 कोटींच्या घोटाळ्याचे आरोप आहेत. यवतमाळ वाशिमच्या शिवसेना खासदार भावना गवळी यांच्यावर भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी 100 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्यामध्ये खासदार भावना गवळी यांनी 100 कोटी रुपयांचा घोटाळा केला, असा आरोप सोमय्या यांनी केला होता.

 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !