धक्कादायक ! : तहसीलदारासह शिपाई एसीबीच्या जाळ्यात


कल्याण : एक लाख 20 हजार रुपयांची लाच घेताना कल्याण तहसीलदार दीपक आकडे यांच्यासह शिपाई मनोहर हरड यांना एसीबीच्या पथकाने अटक केल्याने महसूल वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

  • हे पण नक्की वाचा- धरणगाव पं.स.च्या विस्तार अधिकार्‍यासह ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात

कारवाईने उडाली खळबळ
तक्रारदार यांच्या बांधकाम कंपनीने कल्याणनजीक असलेल्या वरप येथे घेतलेल्या जमिनीबाबतचे हरकतीवरिल सुनावनीचे निकालपत्र देण्यासाठी 26 ऑगस्ट रोजी पडताळणी दरम्यान लोकसेवक तहसीलदार दीपक आकडे यांनी स्वत:साठी एक लाख रुपये लाचेची मागणी करुन ती कार्यालयीन शिपाई लोकसेवक बाबु उर्फ मनोहर हरड यांच्याकडे देण्यासाठी सांगितली. तसेच लोकसेवक बाबु उर्फ मनोहर हरड यांनी स्वत: करीता व स्टाफसाठी 20 हजार रुपये लाचेची मागणी केली होती व सोमवारी एक लाख 20 हजारांची लाच स्वीकारताच दोघांना लाचलुचपत प्रतिबंध विभाग ठाणे यांनी पकडल्याने महसूलच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !