चाळीसगावात चोरीच्या दुचाकी विक्री करणारे रॅकेट पकडले : पाच दुचाकी जप्त
चाळीसगाव शहर पोलिसांची कामगिरी : चोरीच्या दुचाकींबाबत खुलताबाद पोलिसात दाखल आहे गुन्हा
चाळीसगाव : चाळीसगाव शहर पोलिसांनी चोरीच्या दुचाकी विक्री करणार्या चौघांच्या मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून चोरीच्या पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. चोरी झालेल्या दुचाकींबाबत खुलताबाद पोलिसात गुन्हा दाखल असल्याने आरोपींसह दुचाकींचा खुलताबाद पोलिसांना ताबा देण्यात आला. रोहित मच्छींद्र गणराज (19, रांजणगाव पुरी, ता.पैठण, जि.औरंगाबाद), सौरभ साहेबराव इंदापुरे (21, रा.पाण रांजणगाव, ता.पैठण, जि.औरंगाबाद), शुभम दामोधर नेवाल (23, वाळुज शिवराई, ता.गंगापूर, जि.औरंगाबाद), महेंद्र शंकर जाधव (23, रा.गणेशपूर, ता.चाळीसगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
गोपनीय माहितीवरून कारवाई
चाळीसगाव शहरातील पाटखडकी गावाजवळ काही संशयीत औरंगाबाद जिल्ह्यातील चोरीच्या मोटारसायकली विक्रीसाठी येणार असल्याची माहिती चाळीसगाव शहर पोलिसांना मिळाल्यानंतर सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक सचिन गोरे, उपविभागीय पोलिस अधिकारी गावडे, पोलीस निरीक्षक कांतीलाल पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनचे सहा.निरीक्षक कापडणीस, पोलीस हवालदार किशोर सोनवणे, पोलीस नाईक विनोद भोई, पोलीस कॉन्स्टेबल भूषण पाटील, पवन पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.
