पाच हजारांची लाच भोवली : भूकर मापक एसीबीच्या जाळ्यात
पुणे : जमिनीची मोजणी करून देण्यासाठी पाच हजार रुपये लाच स्वरूपात मागणार्या शिरुर येथील भूमी अभिलेख कार्यालयातील भूकर मापक प्रशांत मोहन कांबळे एसीबीच्या पथकाने लाच स्वीकारताच अटक केल्याने लाचखोरांमध्ये खळबळ उडाली. का 53 वर्षाच्या व्यक्तीने तक्रार दिली होती. तक्रारदार यांनी त्यांच्या जमीनीची मोजणी करण्यासाठी शिरुर येथील भूमी अभिलेख कार्यालयात अर्ज केला. यावेळी प्रशांत कांबळे याने त्यांच्याकडे जमीन मोजणी करून देण्यासाठी पाच हजार रुपयांची मोबदला म्हणून मागणी केली. याबाबत तक्रारदारांनी लाचलुचत विभागाकडे तक्रार केली. प्राप्त तक्रारीची सोमवारी पडताळणी केली असता कांबळे याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सापळा रचून त्यास अटक करण्यात आली.
