संतापजनक : महिलेचे दोन प्रियकर व पतीही : हाणामारीत घडले असे काही…!


नवी दिल्ली : विवाहित महिलेचे पूर्वाश्रमीचे दोन प्रियकर व पती अचानक समोर आल्यानंतर त्यांच्यात हाणामारी झाली. त्यात एका प्रियकराचा मृत्यू झाला तर महिला जखमी झाल्याची घटना जयपूरच्या मुहानात घडली. विशेष म्हणजे यावेळी महिलेच्या पतीची प्रियसीदेखील उपस्थित होती. सर्वांनी मद्यप्राशन केल्याची प्राथमिक माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

मद्याच्या नशेत तुफान हाणामारी
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, जखमी महिला बसंती रैगर, गंगापूर शहरात तिचा पती कन्हैया रैगर आणि मुलांसोबत मुहाना मंडी भागात वास्तव्यास आहे. सोमवारी रात्री उशीरा बसंतीचा एक प्रियकर मुकेश शर्मा मुहाना येथे आला व नंतर काहीच वेळात बसंतीचा दुसरा प्रियकरही मोहनया धाकडही तिथे आला तर बसंतीचा पती कन्हैयाची एक प्रेयसी कमली बावरीया सुद्धा त्याचवेळी मंडी परीसरात आली. हे सगळे लोक दारूच्या नशेत आल्यानंतर त्यांच्यात तुफान हाणामारी झाली. भांडणादरम्यान बसंती गंभीरपणे जखमी झाली आणि तिचा एक प्रियकर मोहनया धाकड याचा मृत्यू झाला. पोलिसांना तपासादरम्यान जखमी महिला बसंतीचा पती कन्हैया आणि त्याची प्रेयसी कमली बावरीया हे नशेत असल्याचं दिसलं. त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यांच्याकडे जखमी महिला बसंतीची 2 वर्षीय मुलगीही आढळली. तिला पोलिसांनी देखरेखीसाठी चाइल्ड हेल्प लाईनकडे सोपवलं आहे. पोलिसांनी मृत मोहनयाचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी महात्मा गांधी हॉस्पिटलमध्ये ठेवला आहे. ते जखमी महिलेवर उपचार सुरू आहेत. पोलीस कन्हैया कुमार आणि कमलीची चौकशी करत आहे. तर बसंतीचा दुसरा प्रियकर मुकेश शर्मा याचा पोलीस शोध घेत आहेत.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !