महिला सहा.आयुक्तांवरील हल्ल्याचा निषेध : भुसावळात नगरपालिका कर्मचार्यांची निदर्शने
भुसावळ : ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे कर्तव्य बजावत असताना माथेफिरू विक्रेता अमरजीत यादव याने चाकू हल्ला केल्याने पिंगळे यांच्या हाताची दोन बोटे तुटल्याची संतापजनक घटना सोमवारी घडली होती. या हल्याच्या भुसावळा पालिका कर्मचार्यांनी निषेध करीत मंगळवारी काम बंद आंदोलन केले. दोषी आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी करण्यात आली.
भ्याड हल्ल्याचा भुसावळात निषेध
ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा भुसावळातील पालिका कर्मचार्यांनी निषेध नोंदवला. आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावणार्या एका महिला अधिकार्यावर झालेला हा भ्याड हल्ला अत्यंत संतापजनक आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक जेव्हा कर्तव्य बजावणार्या अधिकार्यांवर हल्ले करतात त्यामुळे अधिकारीच नव्हे संपूर्ण प्रशासनाचे मनोधैर्य खच्ची होत असल्याने हल्लेखोरांवर कठीण कारवाई करणे अपेक्षीत आहे.



यांची होती उपस्थिती
यावेळी मुख्याधिकारी संदीप चिद्रवार, उपमुख्याधिकारी महेंद्र कातोरे, सभा अधीक्षक शे.परवेज अहमद, लेखापाल संजय बाणाईते, लेखा परीक्षक, तृप्ती भामरे, अभियंता नितीन लुंगे, विद्युत अभियंता सुरज नारखेडे, कनिष्ठ अभियंता विजय तोष्णीवाल, आरोग्य निरीक्षक व्ही.सी.राठोड, सहाय्यक लेखापाल विशाल पाटील, लिपिक शांताराम सुरवाडे, प्रमोद मेढे, वैभव पवार, शेख असलम, राजु नटकर, रवींद्र पाठक, राजेश पाटील, दिलीप राजपूत, नगीन सोनार, श्याम बाणाईत, राजू खरारे आदींसह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.


