नाशिक पोलीस दलात फेरबदल : नियंत्रण कक्षातील अधिकार्‍यांकडे पोलीस ठाण्यांची धूरा


नाशिक : शहर पोलीस दलात पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी खांदेपालट करत पोलीस नियंत्रण कक्षातील अधिकार्‍यांना पोलीस ठाण्यांची धूरा सोपवली आहे. पंचवटी पोलीस ठाण्याची सूत्रे मध्यवर्ती गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांच्याकडे तर भद्रकालीची धुरा संभाजी निंबाळकर यांना सोपविण्यात आली. सरकारवाड्याचे हेमंत सोमवंशी यांचीही बदली करण्यात आली असून त्यांच्या रिक्तपदी सुनील जाधव यांना संधी देण्यात आली. गंगापूरचे अंचल मुदगल यांच्या बदलीने रिक्त झालेल्या पदावर सरकारवाड्याचे पोलीस निरीक्षक रियाज शेख यांची नियुक्ती करण्यात आली. दरम्यान, कोणत्या पोलीस निरीक्षकांना कुठे पदोन्नती दिली जाते, याविषयीची उत्सुकता ताणली गेली होती. पाण्डेय यांनी पोलीस नियंत्रण कक्षातील अधिकार्‍यांना प्राधान्यक्रमाने संधी देत विविध पोलीस ठाण्यांचा कारभार सोपविला आहे.

पोलीस ठाण्यांना मिळालेले नवीन अधिकारी असे… (कंसात पूर्वीचे ठिकाण)
म्हसरूळ- भारतकुमार सूर्यवंशी (वाहतूक शाखा)
मुंबई नाका- भगीरथ देशमुख (नियंत्रण कक्ष)
इंदिरानगर- श्रीपाद परोपकारी (सायबर पोलीस ठाणे)
नाशिकरोड- अनिल शिंदे (उपनगर पोलीस ठाणे)
उपनगर- नीलेश माईनकर (इंदिरानगर)
साजन सोनवणे- शहर वाहतूक शाखा (भद्रकाली)
विजय ढमाळ – गुन्हे शाखा-1 (मुंबईनाका)
आनंदा वाघ – गुन्हे शाखा-2 (युनिट-1)
कुंदन जाधव- मध्यवर्ती गुन्हे शाखा (उपनगर)
अंचल मुदगल- मध्यवर्ती गुन्हे शाखा (गंगापूर)
महेंद्र चव्हाण- सायबर पोलीस ठाणे
सुरज बिजली- सायबर पोलीस ठाणे (नाशिक रोड)
देवराज बोरसे- शहर वाहतूक शाखा (सायबर पोलीस ठाणे)
हेमंत सोमवंशी- दहशतवाद विरोधी सेल (सरकारवाडा)

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !