पोलीस निरीक्षकासह नाईक एसीबीच्या जाळ्यात


30 हजारांची लाच मागणी भोवली : पोलीस वर्तुळात खळबळ

नाशिक : तक्रारदार महिलेच्या पतीला एका प्रकरणात अटक झाल्यानंतर पुन्हा पोलीस कोठडी (रीमांड) वाढून न मिळण्यासाठी तसेच अन्य गुन्ह्यात अटक न होण्यासाठी मालेगावच्या आझाद नगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रदीप नवनाथ आव्हाड (34) यांनी पोलीस नाईक सुनील हिंमतराव पाडवी (40) यांच्या करवी 30 हजारांची लाच मागितली होती. तक्रारदाराने याबाबत एसीबीकडे तक्रार नोंदवल्याने लाचेची पडताळणीदरम्यान 8 ऑगस्ट रोजी लाच मागितल्याचे सिद्ध झाल्याने उभयंतांना अटक करण्यात आली.

यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलीस अधीक्षक निलेश सोनवणे व पोलीस उपअधीक्षक सतीश भामरे (वाचक), पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार (वाचक) यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सुनील पाटील, पोलीस निरीक्षक साधना इंगळे, हवालदार दीपक कुशारे, हवालदार साचिन गोसावी, राजू गीते, शरद हेम्बाडे, संतोष गांगुर्डे, परशराम जाधव आदींच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !