मेहुणीच्या प्रेमात पडले भावोजी… अन् उचलले टोकाचे पाऊल


नवी दिल्ली : प्रेमाला वयाचे बंधन नसते, असे म्हणतात. या उक्तीला साजेशी घटना उत्तर प्रदेशच्या बरेली जिल्ह्यात घडली. आपल्यापेक्षा वयाने कमी असलेल्या मेहुणीच्या प्रेमात भावोजी आकंठ बुडाले मात्र घरच्यांचा नात्याला विरोध होईल हे गृहीत धरून दोघांनी विष प्राशन केले. उपचारार्थ दोघांना हलवले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. युपीतील बरेलीच्या भोजीपुरा भागात 26 वर्षीय पुरूषासह 22 वर्षीय तरुणी बेशुद्धावस्थेत आढळल्यानंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मृतक जवळच्याच पीलीभीत जिल्ह्यातील रहिवासी असून त्याच्यासोबत असलेली महिला त्याच्या पत्नीची लहान बहीण होती. चौकशीतून समोर आलं की, या व्यक्तीचं त्याच्या मेहुणीसोबत अफेअर होतं. दोघांचंही एकमेकांवर प्रेम होतं. पण त्यांच्या परीवाराचा या नात्याला विरोध होता. त्यानंतर भावोजी आणि मेहुणी घरातून पळून गेले आणि त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !