भुसावळात विशेष पोलीस महानिरीक्षकांचा राष्ट्रवादी शहराध्यक्ष नितीन धांडेंनी केला सत्कार
भुसावळ : भुसावळ दौर्यावर आलेले नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर पाटील यांचा भुसावळातील राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन धांडे यांनी रविवारी सायंकाळी शहरात सत्कार केला. डॉ.पाटील हे भुसावळातील संतोषी माता सभागृहात रविवारी सायंकाळी गणेशोत्सव मंडळाच्या बैठकीसाठी जात असताना अष्टभूजा देवी मंदिराजवळ भुसावळातील राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते नितीन धांडे यांनी नाशिक विभागाचे नूतन विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर पाटील यांचा सहृदय सत्कार केला व त्यांना भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी राष्ट्रवादीचे गटनेता व नगरसेवक दुर्गेश ठाकूर, नगरसेवक उल्हास पगारे, रंजीत चावरीया, राहुल बोरसे, राजू भोई आदींची उपस्थिती होती.
- भुसावळात 1 तर जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे 3 रुग्ण आढळले





