महिला पोलीस कर्मचार्‍याची गळफास घेत आत्हमत्या


पुणे : दौंड पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल असलेल्या पूजा अमोल सकपाळ ऊर्फ कांबळे (28, रा.तळजाई कॉलनी, प्रियदर्शनी शाळेसमोर, धनकवडी) या महिला कमृचार्‍याने धनकवडीतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. रविवारी मध्यरात्री ही घटना घडली. घरगुती कारणावरुन महिलेने आत्महत्या केली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. पूजा सकपाळ दौंड पोलीस ठाण्यात अंमलदार म्हणून कार्यरत आहेत. सध्या त्या सुट्टीवर धनकवडी येथे आल्या होत्या. धनकवडी मध्ये त्यांचे तीन मजली घर आहे. पती, दोन मुले आणि सासू, सासरे असा परिवार आहे. रविवारी रात्री उशिरा त्यांनी दुसर्‍या मजल्यावर घरात ओढणीच्या साह्याने आत्महत्या केली. सहकारनगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पूज यांच्या पश्‍चात पती, सासु सासरे, साडेतीन वर्षाचा मुलगा आणि 8 महिन्यांचे बाळ असा परीवार आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !