मलकापूर हादरले : मुलीने केली पित्याची हत्या
मलकापूर : छातीत सुरा मारून मुलीनेच आपल्या पित्याची हत्या केल्याची घटना शहरात घडल्याने खळबळ उडाली आहे. या हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी घरगुती वादातून ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. बुधवारी रात्री ही घटना सुभाषचंद्र बोस नगरात बुधवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास घडली. खून प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक करून त्यांच्याविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल केला.
मुलीनेच केली पित्याची हत्या
मुक्ताईनगर बसथांब्यापाठीमागे सुभाषचंद्र बोस नगरात गुलाब यादवराव रावणचवरे वास्तव्यास होते. बुधवारी रात्री गुलाब यादव रावणचवरे यांचा त्यांची मुलगी लक्ष्मी हरिश्चंद्र सनिसे (19), मयताचा पुतण्या प्रकाश साहेबराव रावणचवरे (28, रा.बहापूरा) या दोघांनी संगनमताने गुलाब रावचणचरे यांच्या छातीवर चाकूचे सपासप वारून त्यांची हत्या केली. या घटनेची माहिती कळताच डीवायएसपी अमोल कोळी, पोलीस निरीक्षक प्रल्हाद काटकर यांच्यासह पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. दोघा आरोपींना अटक करण्यात आली आहे. कौटुंबिक वादातून मुलीने पित्याची हत्या केल्याचे बोलले जात आहे.
