शिक्षिकेवर बलात्कार ; आरोपी म्हणाला, मी रीटायर्ड एसीपी, माझेही काहीही होणार नाही !
पिंपरी : दरमहा 10 टक्के व्याजाने पैसे देतो, असे म्हणून आरोपीने फिर्यादी महिलेकडून दोन कोर्या धनादेशांवर व कोर्या कागदावर सह्या घेतल्या. त्यानंतर फिर्यादीला शीतपेय जबरस्तीने लैंगिक अत्याचार केले तसेच विवस्त्र अवस्थेतील फोटो काढून घेऊन फिर्यादीला पैसे दिले नाहीत शिवाय पीडीतेच्या नोकरीच्या ठिकाणी आरोपी गेल्यानंतर तू जर नाही आली तर विवस्त्र अवस्थेतील फोटो स्कूलमध्ये व तुझ्या घरच्यांना दाखवून तुझी बदनामी करतो, अशी धमकी देत आरोपीने अत्याचार केला. तू जर ओरडलीस तर , तू जर कोणाला काही सांगितले तर तुला व तुझ्या घरच्यांना मारून टाकेल, मी रिटायर एसीपी आहे, माझे कोणीही काहीही वाकडे करू शकत नाही, अशी धमकी देऊन आरोपीने जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले. पिंपळे गुरव येथे डिसेंबर 2019 ते 8 ऑगस्ट 2021 या कालावधीत ही घटना घडली. या प्रकरणी पीडित महिलेने याप्रकरणी शुक्रवार, 10 रोजी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून आरोपी विकास अवस्ती (रा.पिंपळे गुरव) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
महिला शिक्षिकेवर अत्याचार
दरमहा 10 टक्के व्याजाने पैसे देतो, असे सांगून शिक्षिकेवर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर सांगवी पोलिसांनी गुन्ह्याच्या तपासाला वेग दिला आहे. आरोपीने महिलेचे विवस्त्र अवस्थेतील फोटो काढून पैसे दिले नाहीत. मी रिटायर एसीपी आहे, तुला व तुझ्या घरच्यांना मारून टाकीन, अशी धमकी दिली. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पीडित महिला शिक्षिका म्हणून नोकरी करीत असताना त्यांना पैशांची अडचण होती. त्यामुळे त्यांनी ओळखीने आरोपी विकास अवस्ती याच्याकडे पैशांची मागणी केली.
