कोणार्क एक्स्प्रेसमध्ये गांजा जप्त


कल्याण : कल्याण  स्थानकात थांबलेल्या कोणार्क एक्सप्रेसमधून रेल्वे सुरक्षा जवानांनी पहाटे दोन लाख रुपये किमतीचा २१ किलो गांजा जप्त केला.
हा गांजा अंमली पदार्थविरोधी पथकाच्या ताब्यात देण्यात आला. एक्सप्रेसच्या डी-दोन डब्यात एका आसनाखाली ही पिशवी सापडली. ती कोणी ठेवली याचा शोध सुरू आहे,
असे पोलिसांनी सांगितले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !