चिनावलकरांना लागली लॉटरी : एटीएममधून निघाली पाच पट रक्कम


चिनावल : चिनावलकरांना एटीएममधून पैसे काढताना चांगलीच लॉटरी लागली. एटीएममधून रक्कम काढताना चक्क पाच पट पैसे निघत असल्याने हजारोंच्या संख्येने बसस्थानक परीसरातील टाटा इंडीकॅश एटीएमबाहेर रात्री 7 ते 9 वाजेपर्यंत मोठी गर्दी उसळली. दोन तासांतच 6 लाखांची रक्कम काढली गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली. हा प्रकार कळताच पोलिसांनी एटीएम बंद करून गर्दी पांगवली. मंगळवारी सायंकाळी चिनावल येथील टाटा इंडिकॅशच्या एटीएममधून टाकलेल्या रकमेच्या पाच पट पैसे निघत असल्याची बातमी गावात पसरली. यानंतर अनेकांनी एटीएम गाठून अवघ्या दोन तासात सुमारे 6 लाख रुपये काढले. रात्री 9 वाजेच्या सुमारास इंडीकॅश कंपनीच्या ठेकेदारी तत्त्वावरील कॅश लोडिंग कर्मचार्‍याला ही माहिती मिळताच तो गावात दाखल झाला. त्याने सावदा पोलिस ठाण्यात संपर्क साधला. यानंतर पोलिसांनी चिनावल गाठून एटीएमवरील गर्दी पांगवली.

दहा हजारांची लाच घेताना दोघे पोलीस एसीबीच्या जाळ्यात

तांत्रिक बिघाडाने पाच पट रक्कम आली बाहेर
एटीएममध्ये पैसे भरताना नोटांची ब्लॉक सेटींग चुकीची झाली असल्याने किंवा मशीन सेटींगमध्ये बिघाड झाल्याने एटीएमएममधून चक्क पाच पट रक्कम बाहेर येत असल्याने नागरीकांनी मोठ्या संख्येने पैसे काढण्यासाठी गर्दी केली होती. मंगळवारी चिनावलचा आठवडे बाजार असल्याने सकाळी एटीएममध्ये 7 लाख रुपये टाकण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, ज्यांनी-ज्यांनी एटीएममधून रोकड काढली त्याबाबत माहिती काढण्यात येणार असल्याची माहिती आहे.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !