चारीत्र्याच्या संशयातून पत्नीची केली हत्या


पिंपरी : पत्नीच्या चारीत्र्यावर नेहमीच संशय घेणार्‍या पतीने पत्नीचा गळा आवळत खून केला. महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह घरात संशयास्पदरित्या आढळल्याची घटना जाधववस्ती, रावेत येथे बुधवारी रात्री साडे आठच्या सुमारास उघडकीस आली. खैरूनबी उर्फ मुन्नी हैदर नदाफ ( 38, रा. जाधव वस्ती, रावेत), असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी मलिक शेंकुबर नदाफ (वय 39, रा. अक्कलकोट एमआयडीसी, सोलापूर) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार हैदर साहेबलाल नदाफ (रा. लोणी स्टेशन, पुणे. मूळ रा. दक्षिण सोलापूर, जि. सोलापूर) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला.

नाडीने आवळला महिलेचा गळ
पत्नीच्या चारीत्र्यावर संशय असल्याने आरोपी पती पत्नीचा छळ करीत असल्याने पत्नी खैरूनबी त्याच्यापासून विभक्त झाल्या होत्या. मित्राच्या ओळखीने खैरूनबी यांना रावेत येथील जाधव वस्तीत भाडेतत्वाने घर मिळाले. 12 व नऊ वर्षांची दोन मुले व सहा वर्षांची एक मुलगी, अशा तीन मुलांसह खैरूनबी जाधवस्ती येथे राहात होत्या. आरोपी हैदर नदाफ हा मंगळवार, 21 रोजी खैरुनबी यांच्याकडे आला होता. मुलांना घराबाहेर थांबवून आरोपीने नाडीने खैरुनबी यांचा गळा आवळून खून केला. त्यानंतर तिनही मुलांना रिक्षातून घेऊन जाऊन लोणी काळभोर येथे नातेवाईकांकडे मुलांना सोडून आरोपी पतीने पलायन केले. खैरूनबी दिसत नसल्याने घरमालक व स्थानिकांच्या उपस्थितीत दरवाजा उघडला असता खैरुनबी घरात मृतावस्थेत आढळल्या. याबाबत खैरुनबी यांचा भाऊ मलिक शेंकुबर नदाफ यांना माहिती देण्यात आली. त्यांनी फिर्याद दिल्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !