जाती-पातीचे व भावनिक राजकारण करणार्यांना वरणगावकरांनी निवडणुकीत हद्दपार करावे : माजी नगराध्यक्ष सुनील काळे
वरणगाव : वरणगाव शहराचा विकास भाजपानेच केला असून जाती-पातीच्या भावनिक राजकारणाला जनता कंटाळली असून वरणगावात केलेल्या विकासाला जनता मतदान करून भाजपाचा झेंडा बहुमतात फडकेल, असा ठाम विश्वास माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी येथे व्यक्त केला. शहरातील शिवतीर्थावर श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा वर्षपूर्ती सोहळा व प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांच्या जन्म दिनानिमित्त वरणगाव येथे सेवा समर्पण सप्ताहानिमित्त कोरोना योद्ध्यंचा सत्कार हभप ज्ञानेश्वर माऊली जळकेकर यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. दरम्यान, पूर्वीचे वरणगाव व आताचे वरणगाव विकासाच्या बाबतीत भाजपाने जोरदार बदल घडवून आणला हे जिल्ह्यासाठी आदर्श असल्याचे हभप जळकेकर महाराज यांनी यावेळी सांगितले.
यांची होती उपस्थिती
यावेळी माजी नगराध्यक्ष सुनील काळे, भाजपाचे शहराध्यक्ष सुनील माळी, हाजी अल्लाउद्दीन सेठ, कामगार नेते मिलिंद मेढे, जिल्हा उपाध्यक्ष अॅड.ए.जी.जंजाळे, मिलिंद भैसे, डॉ.सादीक अरुण बावणे, विवेक शिवरामे, युसूफ खान, भाजयुमो अध्यक्ष संदीप भोई, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष डी.के.खाटीक, महिला आघाडी अध्यक्षा प्रणिता पाटील-चौधरी, मनोहर सराफ, गोलू राणे, डॉ.प्रवीण चांदणे, डॉ.राहुल भोईटे, डॉ.नितीन सोनवणे, नटराज चौधरी, हितेश चौधरी, डॉ.राहुल भोईटे, डॉ.नितीन सोनवणे, योगेश माळी, साबीर कुरेशी, मुस्लिमभाई अन्सारी, माजी सरपंच सुभाष धनगर, कृष्णा माळी, संदीप माळी, आकाश निमकर, पप्पू ठाकरे, ज्ञानेश्वर घाटोळे, गजानन वंजारी, माळी समाजाचे अध्यक्ष संजय माळी यांच्यासह असंख्य नागरीक उपस्थित होते.






कार्यक्रम यशस्वीतेसाठी यांचे परीश्रम
कार्यक्रम यशस्वीतेसाठी भाजयुमो तालुका उपाध्यक्ष किरण वंजारी, लखन माळी, बळीराम कोळी, रमेश पालवे, अनिल वंजारी, शंकर अण्णा पवार, महेश माळी, विशाल कुंभार, गोलू वंजारी, अझर उल्ला, फहिम शेख, जावेद शहा, छोटू सेवातकर, जय चांदणे, विक्की चांदेलकर, बंटी सुतार, सिराज शेख, संगीता माळी, जयश्री अवतारे, वर्षा बढे, नीता तायडे, कमलाकर मराठे, राहुल जंजाळे, गणेश चौधरी आदींनी परीश्रम घेतले.
डोंगरी नदीत गोरखपूर तांडा येथील तरूण बेपत्ता


