माजी मंत्री खडसेंवर कारवाईबाबत निव्वळ अफवांचा बाजार : नाथाभाऊ म्हणाले ; न्यायव्यवस्थेवर परीपूर्ण विश्वास
भुसावळ : राज्याचे माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्यावर कारवाईबाबत बुधवारी सोशल मिडीयावर विविधांगी चर्चा झडल्या. ईडीकडून नोटीस बजावण्यात आली या शिवाय मुक्ताईनगरातील फार्मवर जप्ती करण्यात आली यासह माजी मंत्री खडसेंवर अटकेची कारवाईदेखील झाली, असा जावईशोध अनेकांनी आपापल्या परीने अर्थ लावला मात्र या सर्व निव्वळ अफवा असल्याचे खुद्द माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनीच स्पष्ट केले. ‘ब्रेकींग महाराष्ट्र’शी बोलताना खडसे म्हणाले की, विरोधकांकडून निव्वळ अफवा पसरवून बदनामी करण्याचा प्रकार सुरू आहे. कुठलेही चुकीचे काम केलेले नाही त्यामुळे घाबरण्याचे काम नाही, न्याय व्यवस्थेवर आपला परीपूर्ण विश्वास आहे.








