सार्वजनिक बांधकामचा गलथान कारभार : वरणगाव नागेश्वर पुलाखाली पाणीच पाणी


वरणगाव :  वरणगाव येथील तीर्थक्षेत्र नागेश्वर महादेव मंदिराजवळील पुलाखाली पाणी साचल्याने नागरीकांना मंदिरात दर्शनासाठी जाण्यास अडचण निर्माण झाली आहे शिवाय बोदवड जाण्यासाठी व वरणगाव येण्यासाठी वाहनधारकांना मोठा त्रास होऊन अपघात घडत आहे. वारंवार सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता ठाकुर यांना सांगितल्यावर सुद्धा समस्या निकाली निघत नसल्याने नागरीकांमध्ये या विभागाच्या कारभाराविषयी संताप व्यक्त होत आहे. पुलाखाली गड्डे पडल्यामुळे वाहने पुला खाली आले की साचलेल्या पाण्यामुळे गड्ड्यांचा अंदाज कळत नसल्याने वाहनधरकांचे अपघात होत आहे. हा प्रश्न निकाली न काढल्यास भाजपाच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशारा माजी नगराध्यक्ष सुनील काळे, हभप हरचंद धनगर, शहराध्यक्ष सुनील माळी, संदीप भोई, भाजयुमो शहराध्यक्ष प्रणिता पाटील, शहराध्यक्ष महिला मोर्चा डी.के.खाटीक आदींनी दिला आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !