नाशिक गुन्हे शाखेचा लाचखोर उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात
नाशिक : तब्बल तीन लाखांची लाच घेताना नाशिक गुन्हे शाखेचा उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात अडकल्याने पोलीस वर्तुळात खळबळ उडाली. उपनिरीक्षक महेश वामनराव शिंदे (38) व खाजगी पंटर संजय आझाद खराडे (45) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
गुन्हा दाखल न होण्यासाठी मागितली लाच
32 वर्षीय तक्रारदार यांचे देवळाली कॅम्प येथील फ्लॅटवर आय. पी. एल. क्रिकेट मॅचचे बेटिंग सुरु असल्याबाबत तक्रारी येत असल्याचे तक्रारदारास सांगून त्यांचे विरूद्ध गुन्हा दाखल न होउ देण्यासाठी, तसेच यापुढे आय.पी.एल. मॅच बेटिंगचा धंदा सुरळीत चालू ठेवण्यासाठी लाचखोर उपनिरीक्षक महेश शिंदे यांनी 25 सप्टेंबर रोजी तक्रारदार यांच्याकडे स्वतःसाठी चार लाखांची मागणी केली तसेच गुरुवार, 30 रोजी तीन लाखांची रक्कम तक्रारदाराकडून स्वीकारल्याने त्यास व खाजगी पंटरास अटक करण्यात आली.


यांनी केला सापळा यशस्वी
पोलीस अधीक्षक सुनील कडासने, प्रभारी अपर पोलीस अधीक्षक सतीश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक अभिषेक पाटील, पोलीस निरीक्षक मीरा आदमाने, नाशिक एसीबीचे निरीक्षक जयंत शिरसाठ, हवालदार प्रफुल्ल माळी, नितीन कराड, प्रभाकर गवळी, प्रवीण महाजन, शिरीष अमृतकर, चालक हवालदार संतोष गांगुर्डे आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.

