महिला कॉन्स्टेबलवर बलात्कार : सरकारी डॉक्टरांना अटक


लखनौ : उत्तर प्रदेशची (यूपी) राजधानी लखनऊमध्ये एका महिला कॉन्स्टेबलवर बलात्कार केल्याप्रकरणी सरकारी डॉक्टरला अटक करण्यात आली. आरोपी डॉक्टरने नशेच्या अवस्थेत तिच्यावर बलात्कार केला होता.
या प्रकरणी एफआयआर दाखल झाल्यानंतर पोलीस आरोपी डॉक्टरच्या शोधात छापे टाकत होते, अखेर मंगळवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली. या प्रकरणी 23 सप्टेंबर रोजी गुन्हा नोंदवण्यात आला होता. तक्रारीनुसार, डॉक्टरने तिच्यावर हॉटेलमध्ये तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला होता, तिला उपचाराच्या बहाण्याने तिला नशेचे औषध देऊन बेशुद्ध केले. आरोपी डॉक्टरची कारागृहात रवानगी करण्यात आहे. ज्याने आपल्या हातांनी या व्यवसायाला काळिमा फसला आहे.. त्याचप्रमाणे पीटीआय या वृत्तसंस्थेत प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, शनिवारी मध्य प्रदेशातील नीमच जिल्ह्यात (एमपी) एका महिला कॉन्स्टेबलवर झालेल्या सामूहिक बलात्कारप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली. या प्रकरणाचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !