लग्नानंतर नवरी निघाली गर्भवती : नवरदेव कुटुंबियांची पोलिसात तक्रार


नवी दिल्ली : लग्नानंतर सुखी संसाराची स्वप्ने नवरदेव रंगवत असतानाच अवघ्या आठ दिवसांपूर्वीच विवाह करून आणलेली नवरी चक्क आठ महिन्यांची गर्भवती असल्याचे कळताच नवरदेवावर बेशुद्ध होण्याची वेळ आली. उत्तर प्रदेशच्या बरेली किलाच्या सराय भागात ही घटना घडली. या प्रकारानंतर नवर्‍या मुलाकडील मंडळींनी पोलिसात धाव घेतली आहे.

पोट दुखल्यानंतर प्रकाराचा उलगडा
तरूणाचं लग्न परीरसरातीलच एका तरूणीसोबत लावून देण्यात आलं. लग्नाला दहाच दिवस झाल्यानंतर नव्या नवरीच्या पोटात दुखू लागलं होतं. तरूणाने डॉक्टरला बोलवलं . त्यानंतर डॉक्टरने जे सांगितलं त्याने सर्वच लोकांच्या पायाखालची जमीन सरकली. दहा दिवसांआधी लग्न झालेली नवरी 8 महिन्यांची गर्भवती असल्याची बातमी परिसरात आगीसारखी पसरली. निकाहच्या दहा दिवसांनंतरच नवरी 8 महिन्यांची गर्भवती आढळल्याने सगळेच हैराण झाले. यानंतर दोन्ही परिवारात एकच गोंधळ उडाला. तरूण म्हणाला की, आम्ही याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. नवरीची मेडिकल टेस्टही केली जाणार आहे. जेणेकरून सत्य समोर येईल.





 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !