बोंबला : लग्न अन तेही प्रेशर कुकरशी ! मग ही बातमी वाचाच
मुंबई : लग्नानंतर घटस्फोट होण्याचा प्रकार नवीन नाही मात्र एका तरुणाने चक्क प्रेशर कुकरशी विवाह केला व अवघ्या चार दिवसात घटस्फोटही दिला आहे. डोके सुन्न करणार्या या लग्नाबाबत माहिती अशी की मूळचा इंडोनेशिया येथील खोइरुल अनाम याने चक्क एका प्रेशर कुकरसोबत घरोबा केला. या आगळ्या-वेगळ्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एका फोटोमध्ये तर अनाम कुकुरला चक्क किस करताना दिसतोय. पण कुकुरसबोत लग्न करुन तो एवढ्यावर थांबलेला नाही. त्याने आपल्या पत्नीला पुढच्या चारच दिवसात घटस्फोटदेखील दिला आहे. घटस्फोट देण्याचे कारण अगदीच चक्रावून सोडणारं आहे.
पत्नी येतो भात म्हणून घटस्फोट
आपल्या पत्नीला म्हणजेच प्रेशर कुकुरला घटस्फोट देण्याचं कारणही तसंच विशेष आहे. माझ्या पत्नीला फक्त भात तयार करता येतो, त्यामुळे मी घटस्फोट घेतोय असं कारण या तरुणाने दिलेलं आहे. मुळात खोइरुल अनाम हा तरुण एक कंन्टेंट क्रिएटर आहे. त्याचे फेसबुकवरील अकाऊंट व्हेरिफाय केलेलं असून त्याचे लाखो चाहते आहेत. त्याच्या या लग्नाच्या पोस्टला आतापर्यंत दहा हजारपेक्षा जास्त लोकांनी शेअर केलं आहे. तर हजारो लोकांनी या फोटोंवर कमेंट्स केल्या आहेत.



