फैजपूरातील अनधिकृत बॅनर काढा अन्यथा रविवारपासून कडक कारवाई
फैजपूर : शहरात लागलेले अनधिकृत पोस्टर्स, बॅनर विरुद्ध पोलीस व पालिका प्रशासनाने कडक धोरण अवलंबले आहे. शनिवारपर्यंत शहरातील अनधिकृत बॅनर न निघाल्यास रविवारी गुन्हे दाखल होत कायदेशीर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा सहा.निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांनी दिला आहे. शुक्रवारी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, तसेच जिल्ह्यातील सर्व मुख्याधिकारी व पोलीस स्टेशन प्रभारी यांची ऑनलाईन बैठक झाली. त्यामध्ये अनधिकृत बॅनर विषयी चर्चा झाली. या चर्चेत जिल्ह्यातील सर्व शहरात असलेले अनधिकृत बॅनर 2 ऑक्टोबरपर्यंत संबंधितांनी काढून घेण्याचे आवाहन करण्यात आले. त्यानंतरही शहरात बॅनर दिसल्यास रविवारपासून संबंधितांवर गुन्हे दाखल करत कडक कारवाई केली जाईल, असे आखेगावकर म्हणाले.
तरुणाईला मोठा दिलासा : नवरात्रोत्सवात गरबा खेळण्यास परवानगी



