भुसावळात भाजपातर्फे पालिकेच्या सफाई कर्मचार्यांचा ‘स्वच्छता दूत’ म्हणून सन्मान
भुसावळ : महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टीतर्फे राष्ट्रपित महात्मा गांधी पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले शिवाय भुसावळ नगरपालिकेच्या कर्मचार्यांचा स्वच्छता दूत म्हणून गौरव करण्यात आला. कोरोनाच्या काळामध्ये प्रचंड भीतीचे वातावरण असतांना सुद्धा नगरपालिकेच्या सफाई कर्मचार्यांनी आपला जीव धोक्यात घालून आपली जबाबदारी सक्षमपणे पार पाडल्याची या कार्याची दखल भाजपाने घेतली. लोणारी समाज मंगल कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार संजय सावकारे होते. त्यांच्याहस्ते नगरपालिकेच्या 137 सफाई कर्मचार्यांना स्वच्छतादूत म्हणून सत्कार करण्यात आला.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
या कार्यक्रमास भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष परीक्षीत बर्हाटे, माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी, आरोग्य सभापती प्रा.दिनेश राठी, समाजसेवक संतोष बारसे, जिल्हा उपाध्यक्ष अजय भोळे, जिल्हा चिटणीस शैलेजा पाटील, महिला आघाडी अध्यक्ष अनिता आंबेकर, ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्र नाटकर, राजु खरारे, अरुण भावसार, लक्ष्मण सोयंके, राजेंद्र आवटे, अजय नागराणी, गिरीश महाजन, सतीश सपकाळे, सरचिटणीस रमाशंकर दुबे, संदीप सुरवाडे, अमोल महाजन, खुशाल जोशी, विशाल जंगले, पवन बुंदेले, सुरेश शर्मा, गिरीश पाटील, प्रा.विलास अवचार, दिलीप कोळी, धनराज बाविस्कर, अनुसूचित जाती विभागाचे शहराध्यक्ष राहुल तायडे, स्वच्छ भारत अभियानाचे शहराध्यक्ष प्रसन्न पांडे, शंकर शेळके, अॅड.अभिजीत मेने, प्रवीण इखणकर, अॅड.योगेश बाविस्कर, दीपक तायडे, गौतम जोहरे, नितीन पाटील, संजय बोचरे, वेद प्रकाश ओझा, चेतन बोरोले, महिला मोर्चाच्या दीप्ती पाटील, पल्लवी चौधरी, युवा मोर्चा सरचिटणीस श्रेयस इंगळे, नंदकिशोर बडगुजर, विनीत हंबर्डीकर, लखण रणधीर, गोपीसिंह राजपुत, चेतन सावकारे, प्रसिद्धी प्रमुख प्रशांत भट, सागर जाधव, मयुर सावकारे यांची उपस्थिती होती.








