मंजूर झालेल्या फळ पिक विम्याची रक्कम लवकरच शेतकर्यांच्या खात्यावर होणार जमा : खासदार उन्मेश पाटील
पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना सन 2021-22 अंतर्गत मोसंबी/लिंबू/डाळिंब/पेरू/सिताफळ/फळपिक (मृग बहार) विमा नुकसान भरपाईची रक्कम मंजूर : खासदार उन्मेश पाटील यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश
जळगाव : प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना सन 2021-22 अंतर्गत मृग बहारामध्ये जळगाव जिल्ह्यातीलमोसंबी / लिंबू / डाळिंब / सिताफळ / पेरू इ. फळपिकांचा विमाशेतकर्यांनी काढलेला होता. या वर्षी खरिप हंगामातील पर्जन्यमानाची परिस्थिती पाहता फळपिक लागवड केलेल्या शेतकर्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला होता. या अनुषंगाने खासदार उन्मेश पाटील यांनी जिल्हाधिकारी, जळगाव यांना विमा कालावधी पूर्ण झाल्यानंतर तात्काळ विमा रक्कम मंजूर करून अदा करण्याबाबत दिनांक – 25 ऑगस्ट 2021 रोजी पत्रद्वारे मागणी केली होती. त्या अनुषंगाने संबंधित विमा कंपनीमार्फत प्राप्त झालेल्या माहितीनुसार जळगाव जिल्ह्यातील एकूण 1080 पात्र विमाधारक शेतकर्यांना रु. 70302310/- (अक्षरी रक्कम रुपये सात कोटी तीन लाख दोन हजार तीनशे दहा मात्र) रक्कम मंजूर झालेली असून लवकरच सदरील रक्कम शेतकर्यांच्या बँक खात्यात जमा होणार असून शेतकरी बांधवांच्या नुकसानीसाठी घेतलेली आग्रही भूमिका फळाला आली असल्याची भावना खासदार उन्मेश पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे.
असे आहेत पात्र लाभार्थी सन 2021-22 अंतर्गत मोसंबी / लिंबू / डाळिंब / पेरू / सिताफळ / फळपिक (मृग बहार) विमा नुकसान भरपाईची रक्कम मंजूर झाली असून सदरील रक्कम पात्र लाभार्थी, तालुका व पिक निहाय खालील प्रमाणे आहे.






अमळनेर (पेरू,लिंबू,डाळिंब) 24 शेतकरी रु.1746300/-
भडगाव (लिंबू,मोसंबी,डाळिंब) 384 शेतकरी रू.20269100/-
चाळीसगाव (लिंबू,मोसंबी,डाळिंब) 72 शेतकरी रू.5638600/-
धरणगाव (पेरू,लिंबू,डाळिंब)4शेतकरी रू.459800/-
एरंडोल (पेरू,लिंबू,मोसंबी) 235 शेतकरी रू.16266850/-
जळगाव(पेरू,लिंबू,डाळिंब) 8 शेतकरी रू.704350/-
पाचोरा (सिताफळ,पेरू,मोसंबी,डाळिंब)155 शेतकरी रू.12292900/-
पारोळा (पेरू,लिंबू,मोसंबी,डाळिंब) 54 शेतकरी रू.5294500/-
रावेर (पेरू,डाळिंब) 49 शेतकरी रू.2830060/-
मुक्ताईनगर (लिंबू,डाळिंब) 6शेतकरी रू.742800/-
जामनेर (सिताफळ,पेरू,लिंबू,मोसंब) 53शेतकरी रू.2297000/-
चोपडा (पेरू,लिंबू,डाळिंब) 24 शेतकरी रू.1486450/
भुसावळ (लिंबू,डाळिंब) 12 शेतकरी रू.273600/-


