चाळीसगावात खड्डेमय रस्त्यांचा अनोखा निषेध : वेदनेतून सुटकेसाठी रीक्षा चालकांना आयोडेक्सचे वाटप
सामाजिक संघटनांच्या वतीने अनोख्या आंदोलनाने पालिकेच्या डोळ्यात घातले अंजन
चाळीसगाव : खड्डेमय रस्त्यामुळे शहरवासीयांची हाडे खिळखिळी झाली असतानाही पालिका प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने पालिका प्रशासनाच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी सामाजिक संघटनांनी बुधवारी चक्क रीक्षा चालकांना आयोडेक्सचे वाटप केले. या प्रकारानंतर किमान पालिका प्रशासनाला जाग येऊन रस्त्यांचे भाग्य उजळावे, अशी अपेक्षा चाळीसगावकर आता व्यक्त करीत आहेत.
शोधूनही सापडत नाही रस्ते
चाळीसगाव शहरातील रस्ते शोधून देखील सापडत नाही कारण रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडल्याने रस्त्यांना नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. अशा बिकट परीस्थितीत नगरपरीषद रस्त्यांची दुरूस्ती करण्यास तयार नसल्यामुळे राजकीय व सामजिक संघटनांच्या वतीने रीक्षा चालकाना मणक्यांचे आजार जडल्याने आजारावर प्रथमोपचार व्हावा म्हणून सामाजिक संघटनांच्या वतीने बुधवार, 6 रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात रीक्षा चालकांना आकाशबामचे (आयोडेक्स) वाटप करण्यात आले.






आतातरी पालिका प्रशासनाला जाग येणार का?
शहरातील रस्ते दुरुस्त व्हावे तसेच गटारींच्या स्वच्छता व साथीच्या आजारावर औषधी फवारणी करण्यात यावी यासाठी रयत सेना,मेरा गाव मेरा तीर्थ,आम आदमी पार्टीच्या वतीने नगरपरिषद हद्दीत सात दिवस आंदोलन पुकारले असून आंदोलनाचा बुधवारी तिसर्या दिवसी सामजिक संघटनांच्या वतीने रिक्षा चालकाना मणक्यांचे आजार जडल्याने आजारावर प्रथमोपचार व्हावा म्हणून सामाजिक संघटनांच्या वतीने बुधवार, रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात रीरक्षा चालकांना आकाशबामचे ( आयोडेक्स) वाटप करण्यात आले.
यांचा आंदोलनात सहभाग
आंदोलनात रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार, प्रा.तुषार निकम, सचिन राणे, मेरा गाव मेरा तीर्थ प्रवर्तक विजय शर्मा, खुशाल पाटील, किशोर पाटील, ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटना नाशिक जिल्हा अध्यक्ष कल्पेश महाले, रयत सेनेचे दीपक देशमुख, प्रदीप मराठे, पापा पठाण, शरद कुंभार, कल्पेश भोई यांच्यासह रीक्षा चालक सहभागी झाले होते.


