भुसावळात प्रार्थनास्थळे उघडल्यानंतर भाजपाचा आनंदोत्सव
आमदार संजय सावकारे यांच्याहस्ते अष्टभूजा देवी मंदिरात द्वार पूजन
भुसावळ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक महिन्यांपासून प्रार्थनास्थळे बंद असल्याने भाविकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत होती. राज्यातील पूर्व परीस्थिती आल्यानंतर भाजपाने मंदिर उघडण्याच्या मागणीसाठी घंटानाद आंदोलनही केले तर नवरात्रोत्सवाच्या पहिल्या माळपासून अर्थात गुरुवार, 7 सप्टेंबरपासून राज्यात प्रार्थनास्थळे उघडण्यात आल्यानंतर भुसावळातील शहरातील भाजपा पदाधिकार्यांनी आनंदोत्सव साजरा केला. शहरातील जामनेर रोडवरील अष्टभुजा माता मंदिराबाहेर झांज व ढोलकी वाजवून आमदार संजय सावकारे यांच्याहस्ते द्वारपुजन करून आरती करण्यात आली. अष्टभुजा मातेचे दर्शन घेऊन उपस्थित सर्व भाविकांना पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला.
यांची होती उपस्थिती
यावेळी भारतीय जनता पार्टी भुसावळ शहराचे शहराध्यक्ष परीक्षीत बर्हाटे, माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी, जिल्हा उपाध्यक्ष अजय भोळे, जिल्हा चिटणीस राजेंद्र चौधरी, शैलजा पाटील, शहर सरचिटणीस रमाशंकर दुबे, महिला आघाडी शहराध्यक्ष अनिता आंबेकर, अजय नागराणी, प्रशांत देवकर, प्रा.विलास अवचार, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष अनिरुद्ध कुळकर्णी, पुंडलिक पाटील, धनराज बाविस्कर, राहुल तायडे, जयंत माहुरकर, संजय बोचरे, प्रसन्न पांडे, महिला मोर्चाच्या दीप्ती चौधरी, पल्लवी पाटील, मंगला वाणी, युवा मोर्चाचे सरचिटणीस श्रेयस इंगळे, नंदकिशोर बडगुजर, विजय डोंगरे, सागर जाधव आदी कार्यकर्ते व भाविक उपस्थित होते.








