सव्वाशे कोटी रुपयांचे 25 किलो हेरॉईन मुंबईत जप्त
नवी मुंबई : बॉलिवूड किंग खान शाहरुख खानचा मुलगा आर्यनला ड्रग्ज प्रकरणात अटक केल्यानंतर मोठ्या प्रमाणात छापेमारी सुरु आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाच्या कारवाईमध्ये एका कंटेनरमधून तब्बल 25 किलो हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत सुमारे सव्वाशे कोटी रुपये आहे. हा कंटेनर नवी मुंबईच्या न्हावा शेवा बंदरात पकडला गेला. या प्रकरणी जयेश संघवी नावाच्या व्यावसायीकालाही अटक करण्यात आली आहे. टाईम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्राच्या अहवालानुसार, नवी मुंबईतील एक 62 वर्षीय व्यापारी इराणमधून शेंगदाणा तेलाच्या खेपेत 25 किलो हेरॉईनची तस्करी करत होता. डीआरआयच्या अधिकार्यांनी नवी मुंबईच्या न्हावा शेवा येथे इराणहून आलेल्या एका कंटेनरला ताब्यात घेतले आणि 4 ऑक्टोबर रोजी त्याचा शोध घेतला.








