प्रहार जनशक्ती पार्टीच्या जळगाव महिला जिल्हाध्यक्षपदी अ‍ॅड.नंदिनी चौधरी


भुसावळ : प्रहार जनशक्ती पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्षपदी अ‍ॅड.नंदिनी अनिल चौधरी यांची निवड करण्यात आली. प्रहारचे प्रदेशाध्यक्ष अनिलजी गावंडे यांच्याहस्ते चौधरी यांना नियुक्तीपत्र प्रसंगी देण्यात आले. यावेळी प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे म्हणाले की, प्रहार जनशक्ती पार्टीचा राज्यात संघटनात्मक विस्तार करून ‘सेवेतून राजकारण’ या पायावर राज्यातील विविध घटकांना पक्षाच्या मुख्य प्रवाहात जोडण्याचे दायीत्व आपल्याकडे देण्यात येत आहे. प्रहारचा आजवरचा नावलौकिक आणि सामान्य माणसाच्या कल्याणाचा हा लढा आपण पुढे नेण्यात यशस्वी व्हाल, असा आशावादही गावंडे यांनी व्यक्त केला. दरम्यान, अ‍ॅड.नंदिनी या भुसावळ पालिकेचे माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांच्या कन्या आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !