वरणगाव शहराला तालुक्याचा दर्जा द्यावा : विभागीय आयुक्तांकडे मागणी


वरणगाव : वरणगाव शहराला तालुक्याचा दर्जा द्यावा, अशी मागणी नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी केली. निवेदनाचा आशय असा की, वरणगाव हे इंग्रज काळात तालुका दर्ज्याचे होते. वरणगावला पूर्वी 72 खेडे लागून होते. हल्ली वरणगाव शहराला 32 खेडे लागून आहेत. हतनूर धरण, दीपनगर वीज निर्मिती प्रकल्प तसेच वरणगावला लागून आयुध निर्माणी , रेल्वे स्टेशन, ग्रामीण रुग्णालय तसेच वरणगाव हे नगरपरीषद असलेले शहर आहे तसेच शासकीय कामासाठी 20 किलोमीटर भुसावळला जावे लागते, ज्येष्ठ नागरीकांना भुसावळला जाणे-येणे शक्य नाही आदी बाबींची दखल घेवून दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. यावेळी भाजपाचे रमेश पालवे, किरण धुंदे, जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद भैसे, गोलू बोदडे, सागर वंजारी उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !