लाव रे तो व्हिडिओ ! : आज पुण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची सभा


पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची बुधवारी सायंकाळी सहा वाजता पुणे शहरातील शुक्रवार पेठेतील सरस्वती संस्थेच्या मैदानात सभा होत आहे. या सभेद्वारे राज ठाकरे मनसेच्या विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार आहेत. मनसेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पक्षाने 1 ऑक्टोबर रोजी जिल्हा प्रशासनाला पत्र पाठवले होते. टिळक रस्ता आणि शनिवार पेठेतील रमणबाग शाळेतील मैदान सभेसाठी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी मनसेने केली होती परंतु जिल्हा प्रशासनाने ही परवानगी नाकारली. परीणामी 5 ऑक्टोबरला होणारी राज ठाकरे यांची सभा पुढे ढकलण्यात आली होती. राज ठाकरे या सभेत नेमके काय बोलतात? याकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !