मुक्ताई दर्शनासाठी आमदार रोहित पवार उद्या कोथळीत !


जळगाव : राष्ट्रवादी पक्षाचे आमदार रोहित पवार संत मुक्ताबाई समाधीस्थळाच्या जुन्या मंदिरात दर्शनासाठी येत असल्याची माहिती रवींद्र पाटील यांनी दिली आहे. शुक्रवार, 22 ऑक्टोबर रोजी शुक्रवारी सकाळी 9 वाजता त्यांचे कोथळीत आगमन होणार आहे. यापूर्वी अनेकदा आमदार रोहित पवार यांनी मुक्ताई दर्शनासाठी येण्याची इच्छा व्यक्त केली होती. तसेच स्वराजध्वज पूजन यात्रा मुक्ताबाई मंदिरात करण्यात आली. त्यावेळी येता न आल्याने शुक्रवार, 22 ऑक्टोबर रोजी शुक्रवारी सकाळी नऊ वाजता आदिशक्ती मुक्ताबाई चरणी माथा टेकवण्यासाठी जुने मुक्ताबाई मंदिर, श्री क्षेत्र कोथळी, मुक्ताईनगर येथे आमदार रोहित पवार येणार असल्याची माहिती अध्यक्ष रवींद्र पाटील यांनी दिली. ते धुळे येथे एकविरा देवीचे दर्शन आणि कार्यकर्त्यांची भेट घेतील तसेच अमळनेर येथे आमदार अनिल पाटलांच्या निवासस्थानी ते भेट देणार आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !