माजी मंत्री खडसेंसह कुटुंबाला नाहक त्रास ; मुक्ताईनगरात आमदार रोहित पवार


आदिशक्ती मुक्ताईचे घेतले दर्शन : एक दिलाने काम करण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन

मुक्ताईनगर : राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सुरू असलेली कारवाई ही राजकीय आकसाने करण्यात येत असून माजी मंत्री एकनाथराव खडसे आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना सुद्धा नाहक त्रास दिला जात आहे. त्यातून ते सहि सलामत बाहेर येतील, असा विश्वास असल्याचे आमदार रोहित पवार येथे म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेतृत्व व कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी शुक्रवारी मुक्ताईनगरात शुक्रवार, 22 रोजी भेट दिली. यावेळी त्यांनी मुक्ताई मंदिरात जाऊन आदिशक्ती मुक्ताईचे दर्शन घेतले.




एकदिलाने काम करून निवडणुकीत विजय मिळवावा
मुक्ताई दर्शनानंतर आमदार पवार यांनी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर यांच्या मुक्ताईनगर येथील वृंदावन या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधताना आमदार रोहित पवार म्हणाले माजी मंत्री एकनाथराव खडसे, अ‍ॅड.रोहिणी खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर या भागात पक्षात नवचैतन्य आले आहे. नवे व जुने गट- तट न मानता येथील सर्व कार्यकर्ते एकदिलाने पक्षाचे काम करत आहेत. गुरुवारी जिल्हा बँकेत महाविकास आघाडीचे सहा उमेदवार बिनविरोध निवडून आल्याची बाब कौतुकास्पद असून आगामी काळात जिल्हा परीषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकीत निश्चित पक्षाला घरघोस यश मिळणार असून त्यासाठी कार्यकर्त्यांनी एकजुटीने मेहनत घ्यायची असल्याचे ते म्हणाले.

यांची होती उपस्थिती
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र भैय्यासाहेब पाटील, माजी आमदार अरुण पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी, सोशल मिडिया सेल जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील, किसान सेल जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे, जिल्हा उपाध्यक्ष विनोद तराळ, तालुकाध्यक्ष यु.डी.पाटील, पंचायत समिती सभापती विकास पाटील, किशोर गायकवाड, युवक कार्याध्यक्ष दीपक पाटील, युवक उपाध्यक्ष पवन पाटील, युवक तालुकाध्यक्ष शाहिद खान, शहराध्यक्ष राजु माळी, महिला आघाडी शहराध्यक्ष निता पाटील, माजी सभापती सुधाकर पाटील, विलास धायडे, दशरथ कांडेलकर, मागासवर्गीय सेल तालुकाध्यक्ष नंदकिशोर हिरोळे यांच्या सह सर्व सेलचे पक्ष पदाधिकारी उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !