भुसावळात अग्रवाल समाजातर्फे कोजागिरी उत्साहात
भुसावळ : शहरातील अग्रसेन भवनात अग्रवाल समाजबांधवांनी कोजागिरी पौर्णिमा 20 रोजी उत्साहात साजरी केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त उपस्टेशन मास्तर अमरलाल अग्रवाल होते. त्यांचे स्वागत कोजागिरी उत्सवाचे प्रमुख नवल मित्तल यांनी केले. अग्रवाल नवयुवक मंडळाचे अध्यक्ष अॅड.गोकुळ अग्रवाल, ट्रस्टी भिकचंद अग्रवाल, महिला मंडळ अध्यक्षा शीतल अग्रवाल, संदीप अग्रवाल, सीताराम अग्रवाल आणि पवन अग्रवाल उपस्थित होते. यावेळी समाजातील गत वर्षी मृत पावलेल्या समाजबांधवांना आदरांजली वाहण्यात आली. आरती केल्यानंतर दूध-वाटप करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
या प्रसंगी संजय अग्रवाल, श्याम अग्रवाल, राजेश अग्रवाल, अनूप अग्रवाल, निकेश अग्रवाल, सतीश अग्रवाल, नवीन अग्रवाल, विजय अग्रवाल, फुलचंद अग्रवाल, देवेंद्र अग्रवाल, रामजीलाल अग्रवाल, रवींद्र अग्रवाल, रामेश्वर अग्रवाल, कमलेश अग्रवाल, राजेंद्र अग्रवाल, सुरेश अग्रवाल, लखन अग्रवाल, सुरेंद्र सिंघल, बीना अग्रवाल, कल्पना टेमानी, सुनीता अग्रवाल, लिलादेवी अग्रवाल, मीना अग्रवाल आदी समाजबांधव मोठ्या सांखेने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा.जगदीश शर्मा तर आभार धीरज अग्रवाल यांनी मानले.








