रावेरात उद्या उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची जाहीर सभा


आमदार हरीभाऊ जावळेंच्या प्रचारार्थ सभा : छोरीया मार्केट प्रांगणात होणार सभा

रावेर : उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची जाहीर सभा गुरुवार, 10 ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजता बर्‍हाणपूर रस्त्यावरील छोरीया मार्केटच्या मैदानात सभा होत आहे. महायुतीचे उमेदवार हरीभाऊ जावळे यांच्या प्रचारासाठी योग्य आदित्यनाथ येत आहेत. प्रखर हिंदुत्वाचे प्रतीक व भाजपाची मुलूख मैदानी तोफ असलेले आदित्यनाथ योगी या सभेत नेमके कोणत्या मुद्यांवर बोलतात? याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. भाजपा-शिवसेना-रासप-रीपाइ-रयतक्रांती-शिवसंग्राम महायुतीचे रावेर विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार आमदार हरीभाऊ जावळे यांच्या समर्थनार्थ विराट विजय संकल्प सभा होत असून महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी व रावेर विधानभेतील सर्व मतदार बंधू भगिनींनी हजारोंच्या संख्येने सभेला उपस्थिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !