मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचे भुसावळात स्वागत
भुसावळ : राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचे भुसावळ येथे जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी अनु.जाती विभागाच्या वतीने ढोल-ताशांच्या गजरात फटाके फोडून व औक्षण करून जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा आमदार शिरीष चौधरी, माजी खासदार व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, जळगाव जिल्हा काँग्रेसचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, जळगाव जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष मनोजकुमार सोनवणे, जिल्हा काँग्रेस अनु.जाती विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष विवेक नरवाडे, भुसावळ काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे शहराध्यक्ष सुनील जोहरे, उपाध्यक्ष विनोद पवार, प्रकाश मोरे, नंदा बावटे, सुरेश टाक, सागर कुरेशी व काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
