49 वर्षीय प्रौढाची कासारखेड्यात आत्महत्या
यावल : तालुक्यातील कासारखेडा येथील 49 वर्षीय प्रौढ व्यक्तीने राहत्या घरात दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना बुधवार, 27 रोजी दुपारी दोन वाजता घडली. यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. विकास पुना कुंभार (49) असे मयताचे नाव आहे. आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही.
यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
कासारखेडा येथील रहिवासी विकास कुंभार हे हाताला मिळेल ते काम करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करीत होते. बुधवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घरात कुणीही नसतांना झोक्याच्या दोरीने छताला गळफास घेत त्यांनी जीवनयात्रा संपवली. आत्महत्या करण्याचे नेमके कारण कळू शकले नाही. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात कैलास पंढरीनाथ कुंभार यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास सहाय्यक फौजदार अजीज शेख करीत आहे.



