मुक्ताईनगर जुने गाव येथील पुनर्वसन प्रश्न तत्काळ मार्गी लावा
मुक्ताईनगर काँग्रेस कमितीतर्फे पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवारांना निवेदन
मुक्ताईनगर : मध्यप्रदेशातील खंडवा लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारार्थ बर्हाणयेथे निघालेल्या पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी मुक्ताईनगर येथील आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासोबत जुने गाव पुनर्वसनाबाबत तत्काळ मार्ग काढण्यासाठी निवेदन दिले. चौथ्या टप्प्याचा पुनर्वसनाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावून मुक्ताईनगर जुन्या गावातील पुनर्वसनग्रस्त लोकांना नवीन जागेत पुनर्वसन होण्यासाठी तत्काळ निर्णय घ्यावा, अशी मागणी आमदार व काँग्रेस कमिटीचे जिल्हा सरचिटणीस डॉ. जगदीश पाटील व सर्व पदाधिकारी यांनी केली.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष एस.ए.भोई, जिल्हा सरचिटणीस डॉ.जगदीश पाटील, मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष दिनेश पाटील, तालुका उपाध्यक्ष अॅड.राहुल पाटील, काँग्रेस शहराध्यक्ष प्रा.पवन खुरपडे, माजी तालुकाध्यक्ष अॅड.अरविंद गोसावी, मागासवर्गीय जिल्हा उपाध्यक्ष बी.डी.गवई, ओबीसी सेल तालुकाध्यक्ष निखील चौधरी, तालुका कार्याध्यक्ष राजेंद्र जाधव, अ.जा.तालुकाध्यक्ष निलेश भालेराव, प्रा.सुभाष पाटील, नामदेव भोई, यासीन खान, रवींद्र महाजन, शहर उपाध्यक्ष आरीफ रब्बानी, शिवाजी पाटील, अनिल सोनवणे, रवी जयकर, वसीम मान्सुरी, सुरेश भोलाणे, राजू वानखेडे, आनंदा कोळी, पवन कांडेलकर आदी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.








