भुसावळात पोलिसांना धक्काबुक्की : पसार आरोपी बाजारपेठ पोलिसांच्या जाळ्यात


भुसावळ : शहरातील हनुमान नगरातील पंचवटी ग्रुपच्या तकदीर मंडळासमोर शुक्रवार, 15 ऑक्टोबर रोजी रात्री स्पिकर लावून गरबा खेळत असलेल्या व नाचत असलेल्यांना स्पिकर बंद करण्याच्या सूचना केल्यानंतर उभयंतांनी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना धक्काबुकी केली होती. या प्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात सात जणांविरूध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील पसार संशयीताच्या बाजारपेठ पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. सुरज रमेश जाधव (25, रा.तुकाराम नगर, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

यांनी केली कारवाई
पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक विकास सातदिवे, निलेश चौधरी, दिनेश कापडणे, रमण सुरळकर, कॉन्स्टेबल ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी, प्रशांत सोनार आदींच्या पथकाने ही कारवाई केली. तपास सहा.निरीक्षक हरीष भोये, योगेश महाजन करीत आहेत.




  • किनगाव खुर्द गावातील अल्पवयीन तरुणीची आत्महत्या 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !