भुसावळात राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे शिवसेना पदाधिकार्‍यांकडून स्वागत


भुसावळ : शिवसेनेचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे प्रवासादरम्यान भुसावळ रेल्वे स्थानकावर स्वागत करण्यात आले. शिवसेनेचे शहर प्रमुख बबलू बर्‍हाटे, माजी नगरसेवक दीपक धांडे, अ‍ॅड.निर्मल दायमा, युवा सेनेचे शहर युवा अधिकारी सुरज पाटील यांनी स्वागत केले. भुसावळ विषयी बोलतांना येणार्‍या नगरपालिका निवडणूकीमध्ये प्रचार सभा घेण्याचे त्यांनी आश्वासन दिले. भुसावळातील सामाजिक आणि राजकीय परीस्थितीतीवर त्यांनी अर्धा तास कार्यकर्त्यांशी चर्चा केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार पूर्ण पाच वर्षे अविरत सुरू राहणार आहे, कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे अश्या सूचना त्यांनी केल्या.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !