रनर्स असोसिएशनतर्फे भुसावळात रविवारी रन फॉर युनिटी


भुसावळ : भुसावळ स्पोर्ट्स अ‍ॅण्ड रनर्स असोसिएशनतर्फे रन फॉर युनिटीचे आयोजन 31 रोजी करण्यात आले आहे. या विशेष रनमध्ये भुसावळ पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचारी सहभागी होतील. रविवार, 31 ऑक्टोबर रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती असून संपूर्ण देशात हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यानिमित्त या रनचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी सकाळी सहा वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदान (डी.एस.ग्राउंड) येथून रनला सुरुवात होईल व तेथून जामनेर रोडमार्गे पांडुरंग टॉकीज व पुढे मामाजी टॉकीज मार्गे सरदार वल्लभभाई पटेल पुतळा व परत डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदान (डी.एस.ग्राउंड) येथे रनची सांगता होईल.

पोलीस अधिकार्‍यांसह कर्मचारी सहभागी होणार
या दरम्यान सरदार वल्लभभाई पटेल पुतळयाला माल्यार्पण करण्यात येईल.
या रन मध्ये भुसावळ स्पोर्ट्स अ‍ॅण्ड रनर्स असोसिएशनचे सर्व महिला व पुरुष धावपटू तसेच भुसावळ पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचारी सहभागी होणार आहेत. शहरातील अधिकाधिक नागरीकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन भुसावळ स्पोर्ट्स अ‍ॅण्ड रनर्स असोसिएशनचे प्रमुख प्रवीण फालक व विभागीय पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी केले आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !