खान्देश सन्मान पुरस्काराने नरेंद्र नारखेडे यांचा गौरव
फैजपूर : शहरातील नरेंद्र नारखेडे यांना खान्देश सन्मान 2021 या पुरस्काराने जळगाव येथील हॉटेल प्रेसिडेंट पार्कच्या सभागृहात गौरवण्यात आले. सिने अभिनेते अभिजीत खांडेकर व सरस्वती प्रतिष्ठानचे किशोर अहिरराव व खान्देशातील मान्यवरांच्या हस्ते नरेंद्र नारखेडे व त्यांच्या पत्नी सीमा नारखेडे यांना पुरस्कारासह सन्मानपत्राचे गौरवण्यात आले. याप्रसंगी नरेंद्र नारखेडे यांनी गेल्या 35 वर्षात केलेले सहकार राजकीय व आध्यत्मिक सामाजिक कार्याची ध्वनी चित्रफीत प्रदर्शित करण्यात आली.
पुरस्कारानंतर शुभेच्छांचा वर्षाव
या कार्यक्रमाचे आयोजन सरस्वती प्रतिष्ठान व सप्तरंग मराठी चॅनल यांनी केले होते. या कार्यक्रमात संपूर्ण खान्देशात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्यांना सन्मानीत करण्यात आले. यात सहकार व आध्यात्मिक व राजकीय क्षेत्रातून नरेंद्र नारखेडे यांची निवड करण्यात आली. कार्यक्रमास सिने अभिनेता अभिजीत खंडकेकर, किरण पातोंडेकर, केशवशेठ भामरे, किशोर अहिरराव, संयोजक पंकज कासार यांच्यासह खान्देशातील मान्यवर उपस्थित होते. पुरस्कारामुळे सार्वजनिक क्षेत्रात काम करायला ऊर्जा व प्रेरणा मिळते. जनतेच्या प्रेमामुळे व सहकार्य मिळाले यामुळे सार्वजनिक क्षेत्रात काम करू शकलो व त्यामुळे पुरस्कार मिळाल्याची भावना नरेंद्र नारखेडे यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना व्यक्त केली.

